शेतकऱ्याला मिळणार 12000, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना, फायदे, पात्रता, अर्ज कसा करायचा?

 शेतकऱ्याला मिळणार 12000, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना, फायदे, पात्रता, अर्ज कसा करायचा?

Sarkari Yojana, Namo Shetkari Maha Samman Nidhi Scheme 2023, Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana
Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana

नमो शेतकरी महा सम्मान निधि योजना ( Namo Shetkari Maha Samman Nidhi Scheme 2023 ) :
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे, यातील ७५% लोक ही शेतीवर अवलंबून आहेत, त्यांची आर्थिक स्थिती शेतीवर अवलंबून असते, हे लक्षात घेऊनच महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे आणि त्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत एक नवीन योजना  राबवण्यात आली आहे, या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे सरकार आहे आणि आता शासनाकडून राज्यातील सर्व जनतेपर्यंत नवीन Sarkari Yojana सुरू करण्यात आल्या आहेत. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना असे या नवीन योजनेचे नाव आहे, या योजनेंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 2023-24 च्या अर्थसंकल्पांतर्गत मुख्यमंत्री आणि वित्त मंत्री यांच्याकडून दरवर्षी 6000 रुपये ची आर्थिक मदत भारत सरकारकडून दिली जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी ही योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेंतर्गत राज्यातील 1.5 कोटी पेक्षा जास्त शेतकरी बांधवांना या योजनेचा फायदा होणार आहे. ही योजना सुरू करण्यामागचा मुख्य हेतू काय आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, अर्जासाठी लागणारे कागदपत्रे काय आहेत. इ. अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे याची सर्व माहिती, तुम्ही आमच्या लेखातून मिळवू शकता.


नमो शेतकरी महा सम्मान निधि योजना 2023


9 मार्च रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023-24 यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा केली आहे. ही योजना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत तयार करण्यात आली आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी, पात्र  असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति वर्ष ₹ 6000 च्या स्वरूपात आर्थिक मदत  केली जाईल, या आर्थिक मदतीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये समान तीन हप्त्यांमध्ये करण्यात येईल. किंवा आर्थिक मदतीची रक्कम थेट हस्तांतरित केली जाईल. लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होईल. किसान सन्मान निधी Sarkari Yojanaतर्गत, केंद्र सरकारकडून ₹6000 आणि महाराष्ट्र सरकारकडून ₹6000, अशाप्रकारे सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी ₹12000 ची आर्थिक मदत शेतीसाठी दिली जाईल. या योजनेसाठी सरकारने 6900 कोटी रुपये गुंतवले आहेत. राज्यातील 1.5 कोटी शेतकऱ्यांच्या कुटुंबाला नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक मदत होईल त्याच्या उत्पन्नात वाढ होईल जेणेकरून त्याचे जीवनमान चांगले होईल.


नमो शेतकरी महा सम्मान निधि योजनेची वैशिष्ट्ये :


नमो शेतकरी महा सम्मान निधि योजनेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे :


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा नमो शेतकरी महा सन्मान निधि योजना सुरू करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6000 रुपयाची आर्थिक मदत प्रदान करणे आहे. ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना उत्तम  जीवन प्रणाली प्रदान करणे आहे आणि त्यांना सशक्त आणि आत्मनिर्भर  बनवायचे आहे. याव्यतिरिक्त एक रुपये प्रीमियम वर सरकार शेतकऱ्यांचा विमा काढेल. प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांकडून 2 टक्के विम्याचा हप्ता घेतला जातो. पण शेतकऱ्यांना पीक विम्याच्या हप्त्याची फक्त १ टक्के रक्कम महाराष्ट्र सरकारला भरावी लागणार आहे. या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर प्रत्येक वर्षी 3212 कोटी दबाव पडणारा आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांना स्वावलंबी व आर्थिक दृष्ट्या ताट करणे हा या सरकारचा मुख्य हेतू आहे.


महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता मिळणार 12000 रुपये :


नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेअंतर्गत, राज्यातील पात्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आणखी 6000 रुपये दिले जातील. सांगायचं झालं तर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फक्त सहा हजार रुपये मिळणार नाहीत तर, त्यासोबतच नमो शेतकरी महासन्माननीती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आणखी अतिरिक्त सहा हजार रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर या दोन्ही योजना मिळून राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी बारा हजार रुपयांचा आर्थिक लाभ किंवा मदत मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारकडून या Sarkari Yojanaचा लाभ घेण्यासाठी लवकरच काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जातील. जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पात्र  शेतकरी बांधवांना मिळू शकेल.


हे देखील वाचा : Maharashtra Swadhar Yojana 2023 ऑनलाइन PDF फॉर्म कसा भरायचा जाणून घ्या


Namo Shetkari Maha Samman Nidhi Scheme 2023 फायदे :


1.नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही Sarkari Yojana केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेसारखीच एक योजना आहे.


2.या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून प्रतिवर्षी 6000 रुपयांची मदत शेतकरी कुटुंबाला महाराज शासनाकडून प्रतिवर्षी 6000 रुपयांची मदत केली जाणार आहे.


3.या योजनेची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवली जाईल.


4.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता वर्षाला 12000 रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे. यातील ५०% महाराष्ट्र सरकार आणि बाकी ५०% केंद्र सरकार देईल.


5.या दोन्ही योजनांद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना दरमहा एक हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे.


6.नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दिला जाईल.

दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा होतील.


7.याशिवाय शेतकऱ्यांचा विम्याचा हप्ताही महाराष्ट्र सरकार भरणार आहे.


8.राज्यातील 1.5 कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळवता येणार आहे.


9.सरकार या योजनेसाठी प्रत्येक वर्षी 6900 कोटी रुपये खर्च करणार आहे.


10.या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळेल स्वावलंबी होतील.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.



नमो शेतकरी महा सम्मान निधि योजनेसाठीची पात्रता :


1.नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.


2.नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातीलच शेतकरी अर्ज करू शकतात.


3.शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असावी.


4.अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याने कृषी विभागाकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.


5.अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे आणि ते आधारशी लिंक असले पाहिजे.



नमो शेतकरी महा सम्मान निधि योजनेसाठीची अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :



1.आधार कार्ड


2.मूळ पत्ता पुरावा


3.बँक खाते तपशील


4.उत्पन्न प्रमाणपत्र


5.जमिनीची कागदपत्रे ( 7/12 )


6.रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो


7.मोबाईल नंबर


हे देखील वाचा : आज या जिल्ह्यांमध्ये पाऊस व गारपीटीची शक्यता, शेतकऱ्यांसमोर पुन्हा एक नव संकट...

नमो शेतकरी महा सम्मान निधि योजनेसाठीची अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे :


नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी शेतकऱ्यांना आणखी थोडी वाट पहावी लागणार आहे. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. याच्या आधारे राज्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. अद्यापही ही योजना सुरू झालेली नाही, तसेच या योजनेच्या अर्जासंबंधी कोणत्याही प्रकारची माहिती अजून पर्यंत सरकारकडून देण्यात आलेली नाही, या संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती आम्हाला प्राप्त होतात, सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांग. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अद्यापही कोणतीही ऑनलाईन वेबसाईट सुरू झालेली नाही. याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी लागणारी माहिती महाराष्ट्र सरकारने अद्यापही सार्वजनिक केलेली नाही. या योजनेस संबंधित सरकारकडून कोणतीही माहिती मिळतात. आम्ही आमच्या लेखाद्वारे तुम्हाला कळू जेणेकरून तुम्ही या योजनेच्या लाभासाठी अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.


सारांश :


आम्ही नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2023 संबंधित सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर केली आहे, तुम्हाला या माहितीशिवाय इतर कोणतीही माहिती हवी असल्यास, तुम्ही खाली दिलेल्या कमेंट विभागात मेसेज करून विचारू शकता. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील. या माहितीवरून आपणाला थोडीफार मदत झाली असेल असे आम्ही मानतो.


संपूर्ण माहिती


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या