“मी वडिलांचे अंत्यसंस्कार केले आणि त्यानंतर…” सई ताम्हणकरने सांगितली जीवनातील एक कटू आठवण, ती म्हणाली, “त्यांचे निधन झालं तेव्हा…”

“मी वडिलांचे अंत्यसंस्कार केले आणि त्यानंतर…” सई ताम्हणकरने सांगितली जीवनातील एक कटू आठवण, ती म्हणाली, “त्यांचे निधन झालं तेव्हा…” 

सई ताम्हणकर, Bollywood, Sai Tamhankar


सई ताम्हणकरने व्यक्त केला तिच्या जीवनातील तो भावुक प्रसंग, वडिलांचा उल्लेख करत तिने म्हटलं…


बोल्ड अँड बिंदास्त अभिनेत्री सई ताम्हणकरणे मराठी सिनेमा सृष्टी सहित बॉलीवूड (Bollywood) सिनेमा सृष्टीतही आता स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘आयफा’, ‘फिल्मफेअर’ असे नावाजलेले पुरस्कार या अभिनेत्रीला मिळालेले आहेत. आपल्या श्री सिनेमा सृष्टीतील कामांमुळे सदैव चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्रीचा खाजगी आयुष्य आजही कोणापासून लपून राहिलेलं नाही. ही अभिनेत्री स्वतः आपल्या खाजगी आयुष्याबाबत नेहमी उघडपणे बोलताना आपल्याला दिसते. एका मुलाखतीमध्ये तिने आपल्या वडिलांबाबतची एक कटू आठवण सांगितली.


सई ताम्हणकरने ‘महाराष्ट्र टाइम्सला’ दिलेल्या सध्याच्या मुलाखतीमध्ये तिने आपल्या वडिलांबाबत भाष्य केलं आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष आणि नैराश्य या गोष्टींचा तुझ्या व्यावसायिक आयुष्यावर काही परिणाम होतो का? असं जेव्हा या अभिनेत्रीला विचारण्यात आले. यावर सईने आपल्या वडिलांचा उल्लेख करत तिच्या आयुष्यातील एक प्रसंग सगळ्यांबरोबर शेअर केला आहे. 


हे देखील वाचा : Keshub Mahindra : भारतातील वृद्ध अब्जाधीश उद्योगपती केशब महिंद्रा यांचे निधन


सई ताम्हणकर म्हणाली: दोन्हीही गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. या दोघांचा एकमेकांवर परिणाम होतो यामधील काही भूमिका या वैयक्तिक आयुष्यामध्ये मान डोकावतात. तर वैयक्तिक आयुष्यामधील एखाद्या गोष्टीचा, आपल्या कामकाजावर ही परिणाम होतो. याबाबत मला एक प्रसंग सांगायचा आहे. सई ताम्हणकरने आपले वैयक्तिक आयुष्य व आपले कामकाज यांचा समतोल राखणं किती अवघड असू शकतं? याबाबत मुलाखतीमध्ये बोलताना आपल्या जीवनातील एक भावुक प्रसंग सांगितला आहे.


सई ताम्हणकर, Bollywood, Sai Tamhankar

सई ताम्हणकर म्हणाली: “हाय काय नाय काय’ या चित्रपटामध्ये मी काम करत असताना. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानेच माझ्या वडिलांचे निधन झाले. यापुढे सई म्हणाली ‘मी वडिलांचे अंत्यसंस्कार केले’ आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी मी चित्रपटाच्या सेटवर काम करण्यासाठी हजर  झाले. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो चित्रपट होता हा विनोदी होता. आणि अशावेळी आपल्या चेहऱ्यावर हास्य हावभाव आणणे फार कठीण असते. ‘’म्हणूनच वैयक्तिक व व्यावसायिक या दोन्ही आयुष्यांमध्ये खूप मोठा फरक जाणवतो’’. या अभिनेत्रीने सांगितलेला हा प्रसंग कोणाच्याही अंगावर काटा आणणारा आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या