वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे मराठी निबंध | Vrukshavalli Amha Soyari Nibandh in Marathi

 वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे मराठी निबंध | Vrukshavalli Amha Soyari Nibandh in Marathi

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे मराठी निबंध, Vrukshavalli Amha Soyari Nibandh in Marathi, Vrukshavalli Amha Soyari Essay In Marathi
Vrukshavalli Amha Soyari Nibandh in Marathi

मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हा निबंध घेऊन आलो आहोत. आम्हाला खात्री आहे की हा मराठी निबंध तुम्हाला नक्की आवडेल.


वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हे संसारात राहूनही विरक्त जीवन जगणाऱ्या तुकाराम महाराजांचे बोल आहे. आपल्यासारख्या चालत्या बोलत्या माणसापेक्षा गावाबाहेरच्या जंगलातील वृक्षवेली त्यांना आपल्याशा वाटतात.  मानवी जगातील क्रोध, लोभ, मद, मोह, अशा विकारांपासून दूर असणारी ही वृक्ष-वेली तुकारामांना जास्त आवडतात;कारण त्यांच्या सहवासातच या महान भक्ताला आपल्या मनाशी संवाद साधता येतो.


 मानव आणि ही वनस्पती सृष्टी ही एकाच विधात्याची लेकरे. पण आज माणूस निसर्गापासून दूर गेला आहे. स्वतः केलेल्या प्रगतीमुळे त्यांच्यातील अहंकार वाढला आहे. ‘मला काहीही अशक्य नाही,’ असे तो मानतो. आपला भूतकाळ तो विसरून गेला आहे. याच निसर्गामध्ये आपण वाढलो, हे आजचा मानव विसरला आहे. याच वृक्षवल्लींच्या सानिध्यात नित्य विहार करणाऱ्या आपल्या ऋषीमुनींनी ‘वेद’ रचले.भारतीय संस्कृतीची भक्कम बैठक आम्हाला दिली, हे सारे सोईस्करपणे आपण विसरलो आहोत.


” वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे|

पक्षीही सुस्वरे। आळविती।।

येणे सुख रुचे एकांताचा वास।

नाही गुणदोष। अंगी येत।। “

प्रगतीचा काय चढलेल्या माणसांनी परमेश्वर निर्मित निसर्गावर घाला घातला आहे. विवेक हरवून बसलेल्या आजच्या माणसात उधाण आले आहे. मोठमोठ्या इमारती उभारण्यासाठी घन-दाट अरण्य उद्ध्वस्त केली जात आहे. अन्न शिजवण्यासाठी, शेकोटी पेटवण्यासाठी,  घरे सजवण्यासाठी वारे माप जंगल तोड केली जात आहे. कायद्याचा बडगा उगारला तरी कोट्यावधी रुपयांच्या चंदनाची चोरी होतच आहे.


हे सारे पाहिले की वाटते, हा माणूस किती अविचारी आहे निसर्ग जणू माणसाला सांगतो की, अरे, हे वृक्ष वर्षानुवर्ष जंगलात उभे आहेत ते तुमच्यासाठीच ना ! वृक्षांची फुले, फळे, पाने, सावली हे सारे आपल्यासाठीच आहे ना ! म्हणून तर तुमच्या पूर्वजांनी त्यांची बरोबरी संत पुरुषां बरोबर केली. वृक्ष बाहू पसरून आपल्यासाठी पावसाची प्रार्थना करतात. वृक्ष आपल्या मुलांनी पायाखालची जमीन घट्ट पकडून ठेवतात व जमिनीची धूप थांबवतात. वातावरणातील प्रदूषण टाळण्या साठी प्रयत्न करतात. अनेक अमूल्य औषधे घेतात.


जे वृक्ष लाविती सर्व काळ |

तयावरी  छत्रांचे छल्लाळ |

जे ईश्वरी अर्पती फळ |

नानाविध निर्मळ |


स्वतः जळून हे वृक्ष इतरांच्या उपयोगी पडतात. वृक्षाचा प्रत्येक अवयव माणूस व पृथ्वीवरील सर्व जीवांना उपयुक्त आहे. वृक्षाजवळ भेदभाव नसतो. ते सर्वांना समान वागणूक देतात. अगदी त्यांच्या अंगावर घाव घालणाऱ्या कुऱ्हाडीचे पातेही तो सुगंधित करतो. मानवाच्या एकाकी जीवनातही वृक्ष साथ संगत देतो. माणूस आपल्या अनेक ठिकाणी या वृक्षांची जपून ठेवतो. तो त्यांच्याशी हितगुज करतो. असे हे वृक्ष मानवाचे एकदम जवळचे मित्र सुद्धा आहेत.


विज्ञानामुळे माणसाने खूप प्रगती केली पण या विकासासाठी माणसाने व विचाराने जंगल तोड केली. आपण आपल्या या वृक्ष मित्राचा घात केल्याने स्वतः वरच दुष्काळाचे प्रदूषणाचे संकट उडवून घेत आहोत. याचा माणसाला विसर पडलेला आहे. वृक्ष ही निसर्गाची फुफुसे आहेत. हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेतात आणि ‘प्राणवायू हवेत’ सोडून हवा शुद्ध करण्याचे काम करतात. यामुळे माणसाची जगणे सुखी झाले आहे. 


हे वृक्ष, यावेळी अनेक मौलिक गोष्टी आपल्याला देतात.  भव्यता आणि निर्मलता ही तर त्यांची ठेवत आहे. पण ‘सर्वांशी समान वागणूक’ हा त्यांच्या जीवनातून मिळणारा खरा संदेश आहे. म्हणून माणूस आपल्या मुळाबाळांशी जसा वागतो, तसाच तो झाडांशीही वागला पाहिजे. 


मित्रांनो हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अजून कोणत्या विषयावरती निबंध हवा असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही त्याच्यावर निबंध देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या