मला पंख असते तर मराठी निबंध | Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh
नमस्कार मित्रा आजच्या निबंधाचा विषय आहे मला पंख असते तर मित्रांनो आजचा हा निबंध खूपच चांगला होणार आहे. मला पंख असते तर निबंधाला लिहायला सुरुवात करूया.
मला पंख असते तर मराठी निबंध |
आपण जेव्हा आकाशामध्ये उडणारे पक्षी पाहतो तेव्हा कधी ना कधी आपल्या मनामध्ये विचार आलाच असेल की आपल्यालाही पंख असते तर काय झाले असते.
मला पंख असते तर मी पक्षांप्रमाणे आकाशात झेप घेतली असती आणि खूप उंचावर जाऊन पृथ्वीवरील सौंदर्याचा अनुभव घेतला असता. या गावातून त्या गावात नुसता फिरतच राहिलो असतो. जशाप्रकारे इतर पक्षी पिकलेली फळे खातात. आंबे, पेरू व इतर स्वादिष्ट फुले खाण्यापासून मला कुणीही अडवले नसते. आंब्याच्या झाडावरची पिकलेल्या आंबे तोडून आंब्याच्या झाडावर बसून खाल्ले असते आणि त्याच्यातल्या गुठल्या खाली टाकल्या असत्या खूप मजा आली असती. मला पंख असते तर माझ्या इतर मित्रान प्रमाणे मला दगडाने आंबे पाडून खाण्याची गरज लागली नसती. झाडावरचे पिकलेल्या आंबे माझ्या मित्रांना सुद्धा आणून दिले असते आणि आम्ही मिळून खाल्ले असते. पक्षी जशाप्रकारे झाडावर घरटी बांधून राहत असतात तशाच प्रकारे मी सुद्धा एक उंच भल्या मोठा झाडावर लाकडांपासून एक छान आणि सुंदर घर बनवले असते. तिथून निसर्गाचा इतका छान देखावा पाहायला मिळाला असता.
मला पंख असते तर आणि एक गोष्ट माझ्या खूप कामी आली असती ती म्हणजे प्रवास. पंख असल्यामुळे मला कोणत्याही वाहनाची गरजच भासली नसती. रस्ता कच्चा असो किंवा पक्का असो वळणा वळणाचा असो किंवा सरळ असो त्याचा मला काहीच फरक पडला असता. आकाशात उंच झेप घेऊन आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी सरळ उडत गेलो असतो. आणि हो मोठी गोष्ट म्हणजे ट्राफिकचा विषयच नाही. पक्षी सुद्धा माझ्याकडे पाहून गडबडून आणि मला पाहून आश्चर्यचकितच होऊनगेले असते. मामाच्या गावाला जायचे असो व इतर कोणत्या ठिकाणी फिरायला जायचे असो खूप मजा आली असती आकाशातून जायला. फक्त वादळी वारे यांपासून थोडं सावध राहायला लागला असत.
आणखी एक गोष्ट झाली असती तर मला पंख असते तर माझ्या मित्रांसाठी व इतर लोकांसाठी सुद्धा मी एक सुपरहिरो झालो असतो. जर एखाद्या ठिकाणी अपघात झाला असेल आणि तिथे रुग्णवाहिका पोहोचायला खूप वेळ लागत असेल. तर मी तिथे जाऊन अपघात ग्रस्तांना येथून घेऊन जवळच्या दवाखान्यात देण्यात मदत केली असती. अशा ठिकाणी ज्या ठिकाणी कोणतीही वाहने जाऊ शकत नाही त्या ठिकाणी मी गेलो असतो. पुरी जगन्नाथ परिस्थितीमध्ये किंवा भूकंपग्रस्त शहरांमध्ये लोकांना मदतीची गरज लागते. अशा परिस्थितीत लोकांना मदत करण्याचे कार्य मी केले असते. जशाप्रकारे सरकार हेलिकॉप्टर द्वारे अन्नपुरवठा करून मदत करते अशाच ठिकाणी मी सुद्धा हातभार लावला असता. अशाच प्रकारची मदत करत राहिल्यामुळे लोकांमध्ये माझ्याबद्दल आपुलकीचा भाव निर्माण झाला असता.
पंख असल्यामुळे मला सामान्य लोकांमध्ये राहून जीवन जगण्यात काही अडथळे सुद्धा आले असतील. जसे की मी कोणत्याही उत्सवामध्ये सहभागी होऊ शकलो नसतो. कारण पंखांमुळे गर्दीमध्ये मला हाताने नसते. याच पंखांमुळे मला शाळेमध्ये सुद्धा खूप अडचणी आल्या असत्या. पंख असल्यामुळे मला एक विशेष जागा ठेवण्यात आली असती ज्या ठिकाणी मी व्यवस्थितपणे बसू शकतो आणि माझ्या पंखांमुळे इतरांना त्रास होऊ शकणार नाही. याच पंखांमुळे मला माझ्या मित्रांपासून दूर राहावे लागले असते. कोणत्याही प्रकारचे मैदानी खेळ मी कधीच खेळू शकलो नसतो. क्रिकेट खेळायला खूप आवडते पण पंख असल्यामुळे मला क्रिकेटमध्ये सहभागी होत आलेले नसते. मी फक्त एक प्रेक्षक म्हणून पाहत राहिलो असतो. नाण्याला जशाप्रकारे दोन बाजू असतात तशाच प्रकारे या पंखांमुळे चांगले आणि वाईट असे दोन परिणाम झाले असते. माझ्या वैयक्तिक जीवनात मोठ्या प्रमाणावर बदल झाला असता. पंख असल्यामुळे इतर लोकांमध्ये किंवा मित्रांमध्ये जावून नाचण्याचा आनंद मला कधीच घेता आला नसता.
मला पंख असते तर मराठी निबंध |
अशा प्रकारे पक्षांच्या पंखांमध्ये पतंगांचे धागे अडकतात आणि ते जखमी होतात. जी परिस्थिती ते अनुभवतात तशीच परिस्थिती मलाही कधी ना कधी अनुभवायला लागली असती. अशा मधून उडता उडता अचानक माझ्या पंखांमध्ये पतंगाचा धागा अडकून पंखाला दुखापत झाली असती आणि याच मुले मला आकाशात उडणे शक्य झाले नसते आणि मी जमिनीवर येऊन आढळतो किंवा झाडांवरती जाऊन अडकलो असतो जशाप्रकारे पक्षी त्यांच्या पंखाला दुखापत झाल्यानंतर विजेच्या तारांवरती झाडांवरती जमिनीवरती पडलेले असतात. खूपच भयानक परिस्थिती अनुभवायला मिळाली असती. कधी आकाशातून उडत असताना तीव्र उन्हामुळे मी चक्कर येऊन कुठेतरी जंगलामध्ये पडलो असतो. आणि मला शोधण्यासाठी आणि माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी इतरांना खूप जास्त मेहनत करावी लागली असती. तसं बोलायला गेलात तर यावर एक उपाय सुद्धा आहे जेव्हा जेव्हा तीव्र उन्हाचा चटका लागलेला असेल तेव्हा मी डोक्यावरती टोपी घालून आणि सोबत एक पाण्याची बॉटल घेऊन आकाशामध्ये शेत घेतली असती. पावसाळा ऋतूमध्ये खूप वाईट परिस्थिती निर्माण झाली असती यावेळी मला घरातून बाहेरच पडतात नसते. आणि जरी मी बाहेर पडलो असतो तरी आकाशा मधून उडत असताना पावसांच्या सरींबरोबरच मला विजेच्या लहरींचा सामना करावा लागला असता. आणि अशा काळामध्ये भिजलेल्या पंखांची निगा राखण्यात सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागली असती. आणि या जगामध्ये फक्त मलाच पंख असल्यामुळे काही वाईट आणि दृष्ट लोकांची नजर माझ्यावर असती त्यांच्यापासून मला स्वतःची रक्षण करावे लागले असते. मी जगामध्ये फक्त मलाच पंख का आले आणि ते कसे आले हे शोधण्यासाठी वैज्ञानिक देखील माझ्या मागे लागले असते.
जर मला पंख असते तर या सर्व गोष्टी माझ्याबरोबर घडले असत्या. देवाने ही सृष्टी बनवताना विचार करूनच बनवलेली आहे त्याला जर मानवाला पंख द्यायचे असते तर त्याने ते दिले असते. मानवाला पंख नाहीत यामागे निर्मात्याचे काही ना काही कारण देखील असेल. त्यामुळे मी सुखी आहे की मला पंख नाहीत.
इतर काही मराठी निबंध :-
1. छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध
0 टिप्पण्या