एक निसर्गरम्य स्थान महाबळेश्वर मराठी निबंध | Mahabaleshwar Nibandh in Marathi

 मी पाहिलेले एक निसर्गरम्य स्थान महाबळेश्वर मराठी निबंध | Mahabaleshwar Nibandh in Marathi 


मित्रांनो आज आपण एक निसर्गरम्य स्थान महाबळेश्वर या विषयावरती एक छानसा निबंध घेऊन आलो आहोत. हा निबंध तुमच्या शालेय कामकाजासाठी अत्यंत उपयोगी ठरू शकतो. तर चला निबंधाला सुरुवात करूया 


एक निसर्गरम्य स्थान - महाबळेश्वर


marathi nibandh, marathi eesay, Mahabaleshwar Nibandh in Marathi, महाबळेश्वर मराठी निबंध
एक निसर्गरम्य स्थान महाबळेश्वर मराठी निबंध

मामाची नवी गाडी महाबळेश्वरचा घाट चढत होती आणि दिवसांची माझी इच्छा पूर्ण होत होती. घाट चढताना आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर बघण्यात मी हरखून गेलो होतो. किती बघायचे आणि कुठे बघायचे असा प्रश्न पडत होता. रस्ता वळणावळणांचा होता. काही अंतर गेल्यावर मागचा वळणदार रस्ता प्रेक्षणीय झाला. आम्ही किती वेगाने वर चढलो याचा अंदाज येऊ शकतो. पुढे संपूर्ण रस्ता दाट झाडींनी व्यापला होता. मध्येच एक सुंदर ठिकाण लागले. क्षणभर वाटले,  आले वाटते महाबळेश्वर, पण छे! ती पाचगणी होती. गाडीच्या आवाजावरून जड लक्षात येत होता. गाडीचा वेग मंदावला होता. मध्येच एखादी खोल दरी नजरेत भरत होती. आणि अंगावर शहारे आणत होती. थंड वारे वाहू लागले तेव्हा कळले की आपण महाबळेश्वरला पोहोचलो आहोत.


 महाबळेश्वर हे श्रीमंतांचे विसाव्याचे आणि गरिबांच्या अन्नाचे ठिकाण आहे. धनिकांचे सुंदर बंगले व धनिकांसाठी बांधलेली आलिशान आहारगृहे, विश्रांती स्थाने यांची तेथे नुसती रेलचेल होती. या श्रीमंतांच्या ऐषोआरामासाठी तिकडे गरीब चकरा मारून पोट भरतात. समाजाच्या दोन वर्गातील ही विषमता येथे विशेषत्वाने जाणवते. पण इथल्या सदाबहार निसर्गाशी असा भेदभाव नाही. तो गरिबांच्या झोपड्यांवर आणि श्रीमंतांच्या बंगल्यांवर, दोन्हीवरही मुक्त हस्ताने आपले वैभव उधळत असतो.


 महाबळेश्वरच्या मुक्कामात प्रथम आम्ही मुंबई पॉईंट पहायला गेलो, कारण तेथून सूर्यास्ताची आगली शोभा दिसते. या पॉईंटवरून खाली उतारावर इतकी सुंदर हिरवळ दिसत होती की, जणू काही परत निघालेल्या भास्करासाठी कुणीतरी हा हिरवागार गालिचाच पसरला आहे, असे वाटत होते. कोणी म्हणतात, मुंबई पॉईंटवरून मुंबईचा समुद्र दिसतो, पण मला मात्र इथून दिसला तो अथांग पसरलेला हिरवा गार सागर.


 रात्री येतील एका ‘हॉलिडे कॅम्प’ मध्ये आम्ही मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी आम्ही ऑर्थर सीट, एलफिस्टन पॉईंट, लॉडविक पॉईंट पाहिले. त्या ठिकाणाहून दिसणारा भव्य, दिव्य निसर्ग बघून क्षणभर भान हरपले. त्या निर्मळ निसर्गरम्य ठिकाणी मला निसर्गाचे देवत्व जाणवले. आम्ही आनंदी अवस्थेत मुक्कामाच्या ठिकाणी परतलो. 


मित्रांनो हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका व अजून कोणत्या नव्या विषयावरती निबंध हवा असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आम्ही त्या विषयावर निबंध देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू धन्यवाद 


खालील विषयावरती निबंध हवा असल्यास क्लिक करा


मी पाहिलेला पहिला पाऊस मराठी निबंध | Mi Pahilela Pahila Paus Marathi Nibandh


माझी आई मराठी निबंध | majhi aai nibandh in marathi


वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे मराठी निबंध | Vrukshavalli Amha Soyari Nibandh in Marathi


मी पक्षी झालो तर मराठी निबंध | Mi Pakshi Zalo Tar Nibandh


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या