मी पाहिलेला पहिला पाऊस मराठी निबंध | Mi Pahilela Pahila Paus Marathi Nibandh

मी पाहिलेला पहिला पाऊस मराठी निबंध | Mi Pahilela Pahila Paus Marathi Nibandh

मित्रांनो आज आपण मी पाहिलेला पहिला पाऊस या विषयावरती एक छानसा मराठी निबंध घेऊन आलो आहोत तर चला निबंध पाहूया.

मी पाहिलेला पहिला पाऊस…


मी पाहिलेला पहिला पाऊस मराठी निबंध, Mi Pahilela Pahila Paus Marathi Nibandh, monsoon marathi essay
मी पाहिलेला पहिला पाऊस मराठी निबंध


उन्हाळ्याची सुट्टी संपून जशाप्रकारे शाळा सुरू झाली होती. तशाच प्रकारे  उन्हाळ्याची रणरण संपून माझा सर्वात आवडता ऋतू म्हणजेच पावसाळा सुरू झाला होता.  पावसाच्या सरी कधी मुसळधार तर कधी अधून मधून रिमझिम चालूच होत्या. आकाशामध्ये नाचणाऱ्या ढगांमुळे आज सूर्याचे दर्शन झालेच  नव्हते.  सांगायचं झालं तर घड्याळामध्ये सकाळचे अकरा वाजले होते तरीही संध्याकाळ झाली आहे असेच वाटत होते.  पावसाच्या सरींसोबत वाराही आपले गाणे गात होता. वर्षामधील हा पहिलाच पाऊस असल्यामुळे मातीचा मन मग्न करणारा सुगंध या वातावरणात सगळीकडे दरवळला होता. 


आज असे वाटत होते की आजचा दिवस हा संपूर्ण  पावसाचा आणि सोबतच वाऱ्याचा सुद्धा आहे. हा पाऊस विजांचा कडकडाट करून या धरतीला ओरडून ओरडून सांगत होता.  की मी आलोय.  प्राण्यांसहित पक्षी सुद्धा या पावसामुळे आनंदी झाले होते.  आणि ते त्यांच्या चिडचिवाटावरून दिसत होते.  पहिला पाऊस म्हटला की बेडूक तर नसतात.  पण त्यांच्यासाठी सुद्धा हे आनंदाची बातमी आली होती.  आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरभरून गेले होते.  आणि हा पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता.


आज कामासाठी बाहेर जाणारी माणसे घरात बसूनच या पावसाचा आनंद घेत होती. मी बाहेर गेलो आणि पाहिले तर लहान मुले सुद्धा खूप आनंदाने या पावसामध्ये भिजत खेळत होती.  पहिल्या पावसामध्ये भिजण्याची जी मजा आणि जो आनंद असतो तो खरं सांगायचं झालं तर शब्दांमध्ये सांगणे फार कठीण आहे. त्याच्या कवळांच्या पावल्या भाऊ लागल्या. आणि यावेळी गरम गरम भजी आईने करून आणले आणि त्यासोबत चहा सुद्धा. आणि आता जो सीन तयार झाला होता  तो एक नंबर होता. या रिमझिम पावसाच्या वातावरणामध्ये गरमागरम भजी आणि चहा म्हणजे सोन्याहून पिवळे.


दिवसभर पावसाने आणि वाऱ्याने जोडपून काढल्यावर संध्याकाळी वातावरण थोडेफार  निवळ झाले.  पाऊस थांबला आहे पाहून दिवसभर घरात अडकून पडलेली सर्व मंडळी पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडू लागली आणि या पावसामुळे काय काय झाले याचा अंदाज घेऊ लागली.. सहाजिकच हा पहिला पाऊस असल्यामुळे अनेक जणांना याचा अंदाज नव्हता. काही लोकांचा शेतमाल हा घराबाहेर होता तर चुलीसाठी लागणारी चलावून लाकडे ही बाहेर उन्हात ठेवलेली होती.  पण ती आता या पावसामुळे सर्व भिजून गेलेले असणार.  तर हा पहिला पाऊस काही लोकांसाठी आनंदाचा होता  तर काहींसाठी नाही.  पण तरीही सर्व आनंदी होते.


 असा हा मी अनुभवलेला या वर्षातील पहिला पाऊस…


मित्रांनो मी पाहिलेला पहिला पाऊस हा मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. व अजून कोणत्या विषयावरती निबंध हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या