आज या जिल्ह्यांमध्ये पाऊस व गारपीटीची शक्यता, शेतकऱ्यांसमोर पुन्हा एक नव संकट
महाराष्ट्र : गेल्या काही दिवसात महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने (Unseasoanl Rain) थैमान मांडले असतानाच राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा या अवकाळी पावसाची भीती निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याला पुन्हा एकदा या अवकाळी पावसाच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार: राज्यांमधील या भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवस हलक्या पावसाची शक्यता दर्शवण्यात आली आहे, यामध्ये यामध्ये कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भया चार पट्ट्यांचा समावेश आहे, तर 13 ते 17 एप्रिल दरम्यान विदर्भात पावसाचा अंदाज सांगण्यात आला असून पूर्व विदर्भ पासून ते उत्तर कर्नाटक पर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा मराठवाड्याच्या भागातून वाहत असल्याने त्या ठिकाणी ढगाळ वातावरण झालेला आहे. आणि यामुळे हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हे देखील वाचा : आजारपणाचा विचार न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या राज्यघटनेसाठी कसे परिश्रम केले?
ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे : कोल्हापूर पुणे रत्नागिरी धुळे अहमदनगर नाशिक नंदुरबार सोलापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला असून पावसाच्या सरींसह गारा पडण्याची ही शक्यता दर्शवली आहे. तर काही ठिकाणी मात्र येल्लो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
यलो अलर्ट असणारे जिल्हे : यामध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश होतो, 13 एप्रिल ते 14 एप्रिल ला आकाश हे ढगाळ राहील व 17 एप्रिल नंतर या ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभाग : या खात्याकडून येणाऱ्या 24 तारखेपर्यंत देशाच्या 10 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. या हवामानातील बदलाचे मुख्य कारण हे वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे असे सांगण्यात आले आहे.
0 टिप्पण्या