मी झाड बोलतोय मराठी निबंध | Tree Autobiography Essay in Marathi
नमस्कार मित्रांनो आज आपण मी झाड बोलतोय या विषयावरती मराठी निबंध घेऊन आलेलो आहोत. या मराठी निबंध मध्ये झाडाची आत्मकथा मांडलेली आहे तर चला मी झाड बोलतोय या निबंधाला सुरुवात करूया
मी झाड बोलतोय मराठी निबंध |
मी एक झाड बोलत आहे. मी खूप उंच आणि आकाराने खूप मोठा आहे. कित्येक वर्ष मी गावाच्या अगदी मध्यभागी आणि रस्त्याच्या बाजूलाच उभा आहे. या गावातील अनेक पिढ्या मी मोठ्या होताना पाहिले आहेत. या गावातील माणसे खूपच प्रेमळ आणि दयाळू आहेत. निसर्गावर प्रेम करणाऱ्या अशा गावांमध्ये मी आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये खूपच आनंदी आहे. मी सतत आनंदी राहण्यामागचं कारण असं आहे की मी प्रत्येकाला मदत करत असतो. मानवाला जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तोच प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन मी प्रदान करत असतो आणि स्वतः कार्बन डाय-ऑक्साइड ग्रहण करत असतो. पण तरीही काही लोक माझ्याबरोबर छेडछाड करतात पण त्याचा माझ्यावर मोठा परिणाम होत नाही. मी शांतपणे गावातील या रस्त्याच्या बाजूला आजही उभा आहे. गावातून येणारे जाणारे वाटे करू माझ्या थंडगार सावळीत विसावा घेत असतात. उन्हाळ्यामध्ये मी त्यांना सावळी देतो आणि पावसाळ्यामध्ये पावसापासून वादळापासून आसरा देतो. आणि दररोज सकाळी गावातील वृद्ध मंडळी माझ्या भोवती बसून गप्पागोष्टी मारत असतात खूप छान वाटते.
गावाच्या बरोबर मध्यभागी असल्यामुळे मला संपूर्ण गाव पाहता येतो. गावातील गावकऱ्यांनी माझ्या खुळा जवळच मारुतीची एक मूर्ती सुद्धा बसवली आहे. प्रत्येक दिवशी गावकरी माझी आणि मारुतीच्या मूर्तीची पूजा अर्चना करतात. आणि शनिवारी तर वातावरण अगदी भक्तीमय होऊन गेलेले असते. यामुळे येणारा जाणारा प्रत्येक वाटे करू मला नमस्कार केल्याशिवाय जात नाही. खूपच छान वाटते हे पाहून की मानवाकडून झाडाचा अशा प्रकारे आदर केला जातोय.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा गावामध्ये उन्हाची चापट बसते तेव्हा येणारी जाणारी प्रवासी उन्हाच्या चटक्यांमुळे थकलेले असतात, घामाघुन झालेले असतात. आणि अशाच वेळी ते माझ्या सावळीत येऊन बसतात. मी माझ्या सावळीत या वाटे करून ना थंडगार वातावरणाचा आनंद देतो. इतक्या उन्हामध्ये सुद्धा उभा राहून मी त्यांना सावळी देत असतो. यासाठी ही लोक माझा धन्यवाद देखील करतात. लोकांचा धन्यवाद ऐकून मनाला खूप बरे वाटते. पण दुसरीकडेच मनामध्ये एक विचार सतत टोचत असतो की काही लोक कारण नसताना सुद्धा माझ्या फांद्या पाने तोडत असतात. त्यामध्ये लहान खट्याळ मुलांचा समावेश आहे. गावातील काही मूळ येऊन माझ्या सावळीत बसून अभ्यास करत असतात. त्याचा मला खूप आनंद वाटतो. पण काही लोक त्यांच्या लहानशा स्वार्थासाठी मला हानी पोहोचत असतात. मी आज खूप मोठा आहे त्यामुळे कोणताही मनुष्य किंवा प्राणी मला सहजगत्या नुकसान पोहोचू शकत नाही.
Tree Autobiography Essay |
माझ्या फांद्यांवरती अनेक पक्षांनी घरटी बांधली आहे. ते आनंदाने माझ्या फांद्यांवरती राहत आहेत. या माझ्या पक्षी मित्रांची मी ऊन वाऱ्या पावसापासून तसेच अन्य त्यांच्या शत्रूंपासून संरक्षण करतो. या पक्षी मित्रांचा किलबिलाट चिवचिवाट ऐकून मला खूप बरे वाटते. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रंगांची पक्षी माझ्या फांद्यांवरती बसलेले असतात. ज्यावेळी मला लहान लहान गोड आणि चविष्ट फळे येतात. तेव्हा हे पक्षी मित्र मजा फळांचा आस्वाद घेतात गावातील अनेक लहान मुलं सुद्धा माझी फळे खातात. देवाने मला यासाठी तर बनवले आहे. आणि याचा मला खूप आनंदही वाटतो. माझ्यामुळे इतरांना आनंद मिळतो यातच माझा आनंद आहे. बरीच लोक रस्त्याच्या कडेला मला पाहून माझी प्रशंसा करत असतात ते म्हणतात की मी किती मस्त झाड आहे. काही लोक माझी स्वादिष्ट फळे खाऊन त्यांची प्रशंसा करतात. मी गावातील वातावरणाला प्रदूषणापासून वाचवतो. माझ्या मुलांनी मातीला अतिशय घट्ट मिठी मारलेली आहे. यामुळे पावसाच्या पाण्यामुळे ह्या भागाची झीज होत नाही. माझ्या आजूबाजूला इतर लहान मोठी झाडे सुद्धा आहे. आणि ती माझी मित्रमंडळी आहे.
गावामध्ये विकास कशाप्रकारे घडत आहे उत्क्रांती होत आहे हे मी पाहत आलो आहे. आता काही वर्षांनी हे काम एका शहरांमध्ये परिवर्तक होऊन जाईल. हा लाल मातीचा कच्चा रस्ता डांबरीकरणांमध्ये पक्क्या रस्त्यामध्ये बदलून जाईल. गावामध्ये दिसणारे सुंदर अशी कौलारू घरे काही वर्षांनी सिमेंट आणि काँक्रीटच्या इमारतींमध्ये बदलून जातील. मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटत असते. की मी रस्त्याच्या बाजूलाच असल्यामुळे जेव्हा हा रस्ता पक्का केला जाईल रुंदीकरण केलं जाईल. तेव्हा हे गावकरी मला तोडून टाकतील का हाच विचार सतत मला टोचत असतो. जर मला तोडलं तर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचं तीव्र उन्हामध्ये काय होईल. ते कशाच्या सावळी खाली आराम करतील. माझ्यावरती राहणारे माझे पक्षी मित्र कुठे जातील. वादळी वाऱ्यांपासून पावसापासून गावकऱ्यांचे रक्षण कोण करेल. विकासामुळे गावातील राहणीमान वाढेल वाहनांची संख्या वाढेल आणि त्यापासून होणाऱ्या प्रदूषणाला कोण थांबवेल. निसर्गाने निर्माण केलेली ही साखळीच नष्ट होऊन जाईल. मग त्यानंतर या सर्व गोष्टींना कारणीभूत कोण असेल हाच विचार माझ्या मनामध्ये सतत येत असतो.
‘’हिरवी छाया हिरवी माया
पानो पाणी हिरवी किमया ‘’
पुढील भविष्यात काहीही हो. मी आज जशाप्रकारे इतरांची सेवा करीत आहे. त्याचप्रमाणे जोपर्यंत मी या ठिकाणी उभा आहे तोपर्यंत मी कोणताही मतभेद न करता प्रत्येकाला समान मानून अशाच प्रकारे सेवा करत राहणार. माझे मनोगत जाणून घेतल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार.
मित्रांनो मी झाड बोलतोय हा मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अजून कुठच्या नवीन विषयावरती निबंध हवा असल्यास तेही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका
इतर काही मराठी निबंध :-
0 टिप्पण्या