पावसाळा मराठी निबंध | Marathi Nibandh on Rainy Season

पावसाळा मराठी निबंध | Marathi Nibandh on Rainy Season

पावसाळा मराठी निबंध, Marathi Nibandh on Rainy Season, pavsala nibandh in marathi
Marathi Nibandh on Rainy Season

मित्रांनो आज आपण पाऊस या विषयावरती निबंध आणला आहे जो तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या कामात अत्यंत उपयोगी आहे.तर मित्रांनो चला पाऊस या विषयावरती निबंध पाहूया 


पाऊस किती लहरी  जून ची सात तारीख सरली, तरी पावसाचा पत्ता नव्हता. एवढंच काय पावसाची दूरवर देखील कुठे चिन्हेही दिसत नव्हती. उकाड्याने माणसे बेजार झाली होती. पावसाचे नक्षत्र कुठे दडी मारून बसले होते. जमिनीला भेगा पडल्या होत्या. उन्हाच्या गरम झळा आपले अस्तित्व जाणून देत होत्या. उकाड्याने लोक अतिशय हैराण झाले होते. पावसाचे आगमन जसजसे लांबत होते, तसतसे लोकांच्या तोंडचे पाणी पलत होते. नाना विषयी प्रकारे लोक वरून राजाची आराधना करत होते. जमीन नांगरून शेतकरी  खिन्नतेने आकाशाकडे डोळे लावून बसला होता.


एके दिवशी अचानक सभोवार अंधारून आले. सोसाट्याचा वारा सुटला सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटून गेली. मनावरून सुखाचे मोरपीस फिरले. ‘आला, आला, पाऊस आला असे म्हणते पावसाच्या स्वागताला सज्ज झाले. आणि खरोखरच पाऊस कोसळू लागला. टपोरी थेंब बरसू लागले. खूप उशीर झाल्यामुळे जणू त्यांना कोसळण्याची घाई झाली होती. हा काल्या ढगांचा जणू मेघ मल्हारच्या ताना घेत असावा. आगमनाला उशीर झाल्यामुळे त्याला अपराधी वाटले असावे. म्हणून सतत अखंडपणे अविरत कोसळत होता. तीन तासानंतर पाऊस ओसरला अचानक आला तसा अचानक थांबला.


केवढा किमयागार हा पाऊस भोवतालच्या वातावरणात कितीतरी कायापालट झाला होता. आकाशातील काळे ढग हरवले होते. आकाश स्वच्छ झाले होते. धरती टवटवीत दिसत होती. पावसामुळे घरात बसून कंटाळलेले लोक बाहेर पडत होते. झाडात दडलेली पावसात भिजलेली पाखरे आपले पंख फडफडवून जण वर्षाराणीचे आभार मानत होती. सारे वातावरण चैतन्यमय आणि प्रसन्न झाले होते. आकाशाकडे नजर लावून बसलेल्या त्या शेतकऱ्यांची डोळे डबडबले होते. आनंदाश्रू होते. असा हा किमयागार पाऊस 


500 शब्दांचा पाऊस या विषयावरती निबंध 


पाऊस सुरू व्हायच्या आधी गर्मीने जमीन खूप तापलेली असते. गर्मीत येणाऱ्या घामामुळे सर्वच लोक खूप संतप्त झालेले असतात. आणि ते आकाशाकडे पाहू लागतात सर्वांच्या मनात एकच आशा असते की हा पाऊस कधी येणार आणि सर्वत्र गारवा पसरवणार या आशेने सर्व लोक ढगांकडे पाहत असतात.


खूप दिवस पावसाची वाट बघितल्यानंतर  रिमझिम पावसाला सुरुवात होते. या पावसामध्ये आम्ही खूप भिजतो व याची मजा वेगळीच असते. पहिला पाऊस पडला की मातीला जो सुगंध येतो तो मला खूप आवडतो. व पावसात भिजता भिजता आम्ही एक गाणे सुद्धा म्हणतो येरे येरे पावसा तुला देतो पैसा पैसा झालाय खोटा पाऊस आलाय मोठा आणखी एक गाणे आहे ते असे की ये ग ये ग सरी माझे मडके भरी सर आली धावून मडके गेले वाहून असे गाणे म्हटले की पाऊस अजून जोरात पडायला लागतो.


पाऊस पडला की सगळीकडे हिरवेगार दिसते. सर्व झाडे हिरवीगार झालेली असतात. गर्मीने तापलेल्या वातावरणात गारवा पसरतो. गर्मी मुले आटलेले नद्या व छोटे छोटे नाले पुन्हा पावसामुळे तुडुंब भरून वाहू लागतात. पाऊस कधी रिमझिम पडतो तर कधी एकदम जोराने पडतो. गर्मीने संत झालेला शेतकरी पावसामुळे खूप  आनंदी होतो व काहीच महिन्यात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पीकही डोलू लागते. 


पाऊस सुरू झाला की मला शाळेत जायला सुद्धा आवडते कारण पाऊस सुरू झाला की पप्पा मला नवीन रेनकोट घेऊन देतात तो घालून पावसातून जाण्याची मज्जा वेगळीच असते तसेच पावसामुळे साठलेल्या पाण्यामध्ये आम्हाला खेळायला मजा येते कागदाच्या होड्या बनवून त्या साठलेल्या पाण्यामध्ये सोडण्यास खूपच मजा येते ही मजा फक्त तेवढीच असते कारण घरी गेल्या नंतर आई ही मजा एका फटक्यात उतरवून टाकते कारण पावसाच्या पाण्यात खेळल्याने आमची कपडे खूप घाण झालेले असतात ते घाण झालेले कपडे पाहून आईला खूप राग येतो व ती आमची सगळी मजा उतरवून टाकते.


कधीकधी पाऊस इतका पडतो की सगळीकडे पाणी साठते व त्यामुळे आम्हाला शाळेला सुट्टी मिळते. जेव्हा पाऊस रिमझिम पडत असतो व थोडेफार ऊन असते तेव्हा आकाशामध्ये इंद्रधनुष्य पाहिला मिळतो तो खूपच छान दिसत असतो. पावसाळ्यात सर्व ठिकाणी बेडूक ओरडत असतात. व मोरही रानात नाचू लागतो.


पावसाळा आला की आमच्या शाळेला सुट्टी मिळते व पावसात खेळायला खूप मज्जा सुद्धा येते यामुळे पावसाळा ऋतू हा मला खूप आवडतो. 


तर मित्रांनो तुम्ही पावसाळ्यात कोण कोणते खेळ खेळता व पावसात मजा करायला तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला मराठीमध्ये कोणत्याही विषयावर निबंध हवा असेल तर आम्हाला नक्की सांगा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या