माझा आवडता संत - संत ज्ञानेश्वर | Maza Avadta Sant Essay In Marathi
मित्रांनो आज आपण माझा आवडता संत संत ज्ञानेश्वर या विषयावरती एक छानसा मराठी निबंध घेऊन आहोत. तर मित्रांनो हा निबंध तुमच्या शालेय कामकाजासाठी अत्यंत उपयोगी असून शकतो. तर चला निबंधाला सुरुवात करूया.
माझा आवडता संत - संत ज्ञानेश्वर |
जो जे वांछील तो ते लाहो। प्राणीजात ।।
एवढा मोठा ग्रंथयज्ञ केल्यावर त्या ज्ञानियांच्या राजाने- संत ज्ञानदेवांनी जे पसायदान मागितले, त्यांत स्वतःसाठी काहीही मागितले नाही; तर या जगातील प्राणीमात्रांना जे जे काही हवे असेल ते ते त्यांना मिलो, हे मागणे विश्वात्मक देवाकडे केले. केवळ मोठ मन ! आणि हे सुद्धा वयाची विशी ओलांडण्यापूर्वीच !
संत ज्ञानेश्वरांचे आचार विचार हे सर्व काही जगावेगले होते. त्यांच्या वाट्याला आलेली दुःखे, त्याचा ताप एवढा भयंकर होता की या दुःखी योगीनेही ताबडतोब स्वतःला जगापासून तोडून टाकले. ‘ नको हे स्वार्थी जग !’ असे त्यांच्या मनात आले. त्यावेळी संत ज्ञानदेवांचा चिमूरड्या बहिणीने त्यांना बोध केला - ‘ विश्व जाहलीया वन्ही । संत मुखे व्हावे पाणी ।’
संत ज्ञानेश्वररादि भावंडात तत्कालीन कर्मठ समाजाकडून छल का सहन करावा लागला? तर ती संन्याशाची मुले होती. आधी संन्यास घेतल्यावर गुरुजींच्या सांगण्यावरून संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी - विठ्ठलपंतांनी पुन्हा संसाराचा स्वीकार केला व त्यानंतर या मुलांचा जन्म झाला. संत ज्ञानदेवांचा जन्म शके 1197 मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी झाला होता. संन्यास घेतल्यावर पुन्हा संसार केल्याबद्दल संत ज्ञानदेवांच्या आई-वडिलांना कर्मठ समाजाने देहांत प्रायश्चित्ताचीही शिक्षा ठोठावली. त्यामुळे लहान असतानाच ही चार भावंडे पोरकी झाली.
आता समाजात संत ज्ञानदेवांनी आपल्या कर्तुत्वाने असे स्थान मिळवले की, संत ज्ञानदेव ही त्यांना आपली माऊली वाटू लागली. संत ज्ञानदेवांनी संपूर्ण समाजाला ‘भागवत धर्मा’च्या छत्राखाली एकत्र आणून समाजातील कुप्रथा नष्ट केल्या. कोणीही श्रेष्ठ नाही आणि कोणीही कनिष्ठ नाही हे लोकांच्या मनात बिंबवून त्यांना भगवंताची उपासना करण्याचा सोपा मार्ग 'नामस्मरण' दाखवला. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांच्या वारीत सर्व धर्म जातीचे लोक एकत्र आले. सर्वांना घेऊन ते पंढरपुरास गेले.
“ माझे जिवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ।।
पांडुरंग मन रंगले । गोविंदांचे गुणी वेधले ।।”
अशा तीव्र शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपली तळमळ बोलून दाखवली आहे. संस्कृतात असलेली गीता स्त्रीशुद्रादिकांना अप्राप्य होती. म्हणून संत ज्ञानदेवांनी ती मराठीत आणली. आपल्याला समोरच्या समाजाला गीतेचा भावार्थ समजावून सांगण्यासाठी संत ज्ञानदेवांनी ‘ भावार्थदीपिका’ सांगितली. संत ज्ञानदेवांना मराठी भाषेबद्दल नितांत आदर होता. ज्ञानेश्वरीतील शब्द शब्दांतून संत ज्ञानदेवाचा विनय व्यक्त होता ज्ञानेश्वरीनंतर त्यांनी 800 ओव्यांचा ‘ अमृताअनुभव’हा स्वतंत्र ग्रंथ लिहिला. वयोवृद्ध, तपोवृद्ध योगीराज चांगदेव यांच्या कोऱ्या पत्राला उत्तर म्हणून ‘ चांगदेव पासष्ठी’ 65 ओव्यांचा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी रचला. याशिवाय आपल्या भोवताळच्या सामान्य जनासाठी हजारो अभंग रचले.
संत ज्ञानदेवांनी लावलेल्या भागवत धर्माचे रोपटे महाराष्ट्रभर पसरले आहे. याचे वर्णन करताना संत ज्ञानदेव म्हणतात,
"इवललेसे रोप । लावियेले द्वारी । त्याचा वेलू गेला गगनावरी ।।
मोगरा फुलला, मोगरा फुलला । फुले वेचिता बहरू कळियासी आला।।"
अशा संत ज्ञानदेवांनी आपले कार्य संपले असे मानून शके बाराशे अठरा मध्येवयाच्या 21व्या वर्षी आलंदी येथे समाधी घेतली.
मित्रांनो माझा आवडता संत संत ज्ञानेश्वर हा मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व तुम्हाला अजून कोणत्या नव्या विषयावरती निबंध हवा असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता त्या विषयावर ती निबंध देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करून धन्यवाद
0 टिप्पण्या