माझी आई मराठी निबंध | Mazi Aai Marathi Nibandh | Mazi Aai Essay in Marathi

 माझी आई मराठी निबंध | Mazi Aai Marathi Nibandh


नमस्कार मित्रांनो आपण आज माझी आई या विषयावरती मराठी निबंध घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो आजचा माझी आई हा निबंध तुम्हाला कसा वाटतो हा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला मग निबंधाला सुरुवात करूया.


माझी आई मराठी निबंध,Mazi Aai Marathi Nibandh,Mazi Aai Essay in Marathi
माझी आई मराठी निबंध


माझी आई मराठी निबंध 300 शब्द | Mazi Aai Marathi Nibandh in 300 Words


“आई माझा गुरु |  आई कल्पतरू

 सौभाग्याचा सागर आई माझी 

प्रीतीचे माहेर |  सौभाग्याचे सार

 अमृताची धार आई माझी…”


आई हा एक साधा सोपा शब्द पण किती माया दळली आहे या शब्दामागे. एक संपूर्ण जगच आहे आई मध्ये. जन्म देणारी आई ही देवाचे रूप असते. लहानपणापासून अंजारून गोंजारून लाडाने खायला प्यायला देणारी आई प्रत्यक्ष अन्नपूर्णा देवी असते. आजारी पडल्यावर एखाद्या डॉ. आणि नर्स दोन्ही बनते. रात्र रात्रभर जागून आपली सेवा करते. कधी प्रेमळ, कधी रागावणारा पण नेहमी निस्वार्थपणे फक्त आपल्या भल्याचाच विचार करतो.


 माझी आई सुद्धा अशीच सामान्य पण तरीही असामान्य आहे. लहानपणापासूनच बघितले तिला दिवस रात्र घरात कष्ट करताना. पहाटे सर्वात आधी उठून स्वयंपाक घरात गोड गोड करणाऱ्या आई मुले झोपमोड होते, पण जेव्हा बिछान्यातून बाहेर आल्यावर समोर वाफालेला चहाचा कप येतो, तेव्हा उरल्या मुरल्या सुस्ती सोबतच चिडचिडपणा निघून जातो.


 मग सुरू होते आईची धावपळ आई अंगोली साठी पाणी काढणं आई माझे कपडे कुठे आहेत, डबा भरला का? मला नाही आवडत ही भाजी, युनिफॉर्म डे काढून, किती किती ऑर्डर्स एका पाठोपाठ एक, पण कधीही न रागावता आई सर्व कामे पूर्ण करते. जिजाऊने शिवाजीला स्वराज्याची प्रेरणा दिली.महात्मा गांधींच्या आईने त्यांच्यात सत्याचा आग्रह रुजवला, तर विनोबांना त्यांच्या आईच्या शिकवणीतून भूदानाची कल्पना आली. विनोबाची आई म्हणाली, 'विन्या, तुझ्याकडे पाच घास असतील तर त्यातले एक घास तरी दुसऱ्याला दे.'


आई एक महान शिक्षिका आहे. म्हणूनच बापूजी म्हणायचे, 'शंभर गुरूंपेक्षा एक आई श्रेष्ठ असते.' आजच्या दहशतवाद आणि भ्रष्टाचाराबद्दल बोलताना आई परवा म्हणाली, "प्रत्येकाला आई असते हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे." खरंच, याचा विचार केला तर हिंसकांचे हात हिंसा करण्यापासून थांबतील. आईने आपल्यासाठी केलेल्या या सगळ्या गोष्टी आठवल्या की मनात येतं, लहानपणापासून तिच्यावर कुणी प्रेम केलंय. ज्याला ते मिळाले नाही त्याचे दुर्दैव! म्हणून कवी यशवंत म्हणतात,


'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'

माझी आई मराठी निबंध,Mazi Aai Marathi Nibandh,Mazi Aai Essay in Marathi
Mazi Aai Marathi Nibandh

माझी आई मराठी निबंध 200 शब्द | Mazi Aai Marathi Nibandh in 200 Words


आई ही ममता आणि वात्सल्याची मूर्ती आहे. आई पुढे स्वर्गाचेही महात्म्य कमी  पडते. आईसारखे दैवत या जगामध्ये कुठेही नाही. आई ही प्रत्येकाच्या आयुष्यात एक वरदान आहे. तिच्या आशीर्वादाने आपण घडतो आई ही थोर गुरु आहे म्हणूनच गांधीजी असे  म्हणतात की “ एक आई शंभर गुरु होऊनही श्रेष्ठ आहे”


 माझी आई माझा अभिमान आहे. ती माझी गुरु, मार्गदर्शक आणि जिवलग आई आहे. ती खूप प्रेमळ, कष्टाळू व समजूतदार आहे. माझ्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर आहे. ती सर्वांची निस्वार्थपणे सेवा करते. माझी आई माझ्यावर शिक्षणाचे व  सद गुणांचे चांगले संस्कार करते. माझ्या प्रगतीसाठी व विकासासाठी मला नेहमी प्रेरित करते जीवनामध्ये काय योग्य आणि का इंस्टाग्राम अयोग्य याची जाणीव करून देते. देश, विथ वाईट समाज, कुटुंब, कर्तव्य आणि आदर्श या गोष्टींचे महत्त्व समजावून सांगते.


 ती माझ्यावर जीवापाड प्रेम करते कधीकधी कटोरी बनते. परंतु त्या मागेही वात्सल्य दडलेले असते. माझी आई आम्हा सर्वांची खूप काळजी घेते. ती सर्वांना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. ती माझ्या कुटुंबाचा आधार-स्तंभ आहे. ती खूपच सोज्वल स्वरूपाची आहे. साधे राहावे आणि शांत जगावे अशी तिची नेहमी शिकवण असते. माझी आई माझी प्रेरणा आहे. मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो. आणि मला इतकी प्रेमळ आई दिली याबद्दल देवाचे आभारही मानतो.


माझी आई मराठी निबंध 100 शब्द | Mazi Aai Marathi Nibandh in 100 Words


आई हा अनमोल शब्द आहे. आई या शब्दांमध्ये संपूर्ण विश्व सामावले आहे.आई ही त्याग, प्रेम व सेवा यांचे खरे प्रतीक. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आईचे महत्व अधिक आहे. माझी आई माझे सर्वस्व आहे. ती माझी गुरु, मार्गदर्शक तसेच खरी मैत्रीण आहे. ती दररोज सकाळी लवकर उठते. आमच्या कुटुंबातील सर्वांची काळजी घेते.  माझी आई माझ्यावर चांगले संस्कार करते. मला चांगले काय वाईट काय हे समजावून सांगते. माझी आई मला फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही, तर जीवन कसे जगावे हे शिकवते.


 ती खूप प्रेमळ, कष्टाळू व समजूतदार आहे. आजारी असताना खाली ती माझी खूप काळजी घेते. गोर गोर गरीब व गरजूंनाही ती वेळोवेळी मदत करते. माझी आईमला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते.ती माझी प्रेरणा आहे. 


आई मराठी निबंध दहा ओळींमध्ये | Mazi Aai Marathi Nibandh in 10 lines


  1. माझ्या आईचे नाव चंद्रप्रभा आहे.

  2.  माझी आई मला खूप माया करते.

  3.  माझी आई खूप समाधानी आहे.

  4.  माझी आई खूप छान स्वयंपाक.

  5.  मला माझ्या आईच्या हाताचे जेवण खूप आवडते.

  6.  माझी आई कुटुंबातील सर्वांची खूप काळजी घेते.

  7.  ती दिसायला खूप सुंदर आहे.

  8.  ती माझी सर्वात जवळची मैत्रीण आहे.

  9.  माझी आई माझ्यावर खूप चांगले संस्कार करते.

  10.  मला माझ्या आईचा अभिमान आहे.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या