एक रम्य पहाट मराठी निबंध - Ek Ramya Pahat Marathi Nibandh | Marathi Essay

एक रम्य पहाट मराठी निबंध - Ek Ramya Pahat Marathi Nibandh


रम्य पहाट मराठी निबंध


नमस्कार मित्रांनो आज आपण रम्य पहाट हा मराठी निबंध पाहणार आहोत. या निबंधामध्ये पहाटेचे वर्णनन करण्यात आले आहे. तर चला रम्य पहाट हा मराठी निबंध पाहूया.


आज वार होता रविवार मी दररोज उशिरा आवडतो पण आज रविवार असल्यामुळे मी लवकर उठलो उठताच क्षणी माझ्या कानावरती चिमण्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला. या आवाजाने या चिमण्यांच्या किलबिलाटाने माझे मन प्रसन्न होऊन गेले. मी उठलो ब्रश केला. चहा, नाश्ता केला. आई आपल्या स्वयंपाकाच्या कामात व्यस्त होती. मी तसाच बाहेर गेलो. बाहेर गेलो तो पाहतो काय सूर्या डोंगरांच्या मागून डोकावत होता. सूर्योदय नुकताच होत होता. सूर्याच्या सोनेरी किरणांनी आकाश उजळून निघाले होते. अशा या सोनेरी सकाळी उठल्यावर खूप छान वाटते मन प्रसन्न होऊन जाते. 


एक रम्य पहाट मराठी निबंध, Ek Ramya Pahat Marathi Nibandh, Marathi Essay, ramya pahat marathi essay
एक रम्य पहाट मराठी निबंध


परिसरातील फुलझाडे जणू सूर्याच्या कोवळ्या किरणांची वाट पाहत होती. आणि मधमाश्याती फुले फुलण्याची वाट पाहत होत्या. सूर्याची कोवळी किरणे फुलांवरपडू लागली होती. आणि त्यांचे कले फुलू लागले होते. ती सुंदर रंगीबिरंगी फुले पाहून आजूबाजूचा परिसर जणू स्वर्गच दिसत होता. तेवढ्यातच शेजारच्या काकू आल्या आणि ती रंगबिरंगी सुंदर फुले त्या काढून घेऊन गेल्या आता तो स्वर्ग जणू नरकच बनला होता. मधमाश्या बघतच राहिल्या काकू आल्या कधी आणि गेल्या कधी कळ्या चांगल्या फुलोही दिल्या नाहीत. अशा आहेत आमच्या या शेजारच्या काकू अत्यंत निर्दयी. कदाचित आजची ही पहाट मधमाशांसाठी रम्य नसावी. हे सर्व बघितल्यावर मी माझ्या मित्राच्या घरी गेलो. पण आजची ही सुंदर रम्य पहाट पाहण्यासाठी तो उठलाच नव्हता. म्हणून मी तिथून बाहेर आलो पुन्हा घरी परततच होतो. 


तेव्हा आमच्या गावामध्ये वासुदेव येताना दिसला तो नाचत नाचत म्हणत होता वासुदेव आला हो वासुदेव आला हे बोल कानावर पडताच मन अजूनही प्रसन्न होऊन गेले. वासुदेव हा आपल्या मराठी संस्कृतीतील एक अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे. वासुदेवाची ही परंपरा अजूनही काही गावांमध्ये आपल्याला पाहायला भेटेल पण महाराष्ट्राच्या अनेक गावांमध्ये ही परंपरा, संस्कृती लोपपावत चालली आहे. आपली संस्कृती आपणच जोपासली पाहिजे आणि तिचे महत्त्व जाणून घेऊन ती इतर लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. जर आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला अशीच एक रम्य पहाट दाखवायची असेल तर वासुदेवाची ही परंपरा जपलीच पाहिजे. वासुदेवाचा आवाज ऐकून घरातील स्त्रिया सुपामध्ये तांदूळ घेऊन उभ्या होत्या. आणि त्या सर्वांचे चेहरे आनंदी होते जर दिवसाची सुरुवात अशा सकाळी ने झाले तर पूर्ण दिवस आनंदात गेलाच समजायचं खूप छान वाटत होतं हे दृश्य पाहून पण मलाही माहिती की ही दृश्य काही वर्षानंतर दिसू शकत नाही.


एक रम्य पहाट मराठी निबंध, Ek Ramya Pahat Marathi Nibandh, Marathi Essay, ramya pahat marathi essay
Ek Ramya Pahat Marathi Nibandh


आणि हो सांगायचं राहूनच केलं की आज आमच्या गावामध्ये गावातील मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा कार्यक्रमाची आयोजन केले होते.  सकाळपासूनच तेथे लाऊड स्पीकरवर मनमोहक मराठी भक्ती गीते लावण्यात आली होती. मंदिरामध्ये गावातील मंडळी जमली होती. त्यातील काही मंडळी मंदिर सजावट करत होती त्यामध्ये झेंडूची फुले आंब्याची पानं यांचे हार बनवून मंदिराला सजवण्यात येत होते. मंदिराच्या कवळांवरून लाइटिंग सुद्धा करण्यात आली होती. मी सुद्धा मदत करण्यासाठी गेलो आणि  मला झेंडूची फुले आणि आंब्याची पाने वळून हार बनवण्याचे काम देण्यात आले माझ्याबरोबर गावातील दुसरी मंडळी सुद्धा होती. आम्ही मिळून हार बनवायचे काम करत होतो. मातीच्या कौलांच्या व लाकडी कामांच्या मंदिरामध्ये सकाळच येऊन बसण्यात आहे  तो तुम्ही कुठेच अनुभवू शकत नाही. जस जसा सूर्य वरती होता तसतशी गावातील इतर मंडळी सुद्धा मंदिराच्या कार्यक्रमातील कामांमध्ये हातभार लावण्यासाठी मंदिरामध्ये समोर होती. आणि अशा प्रकारे मिळून मिसळून काम करण्याची मजाच वेगळी असते. तर अशा प्रकारची होती ही रम्य सकाळ !


एक रम्य पहाट मराठी निबंध, Ek Ramya Pahat Marathi Nibandh, Marathi Essay, ramya pahat marathi essay
Ek Ramya Pahat Marathi Essay


अशी ही रम्य सकाळ आपल्याला फक्त गावातील जीवनामध्येच अनुभवायला मिळू शकते. शहरामध्ये सकाळी उठल्यावर चिमण्यांचे पक्षांचे किंवा भक्ती गीतांचे आवाज कानी पडण्याआधीच वाहनांचे कर्कश आवाज कमी पडतात. शहरामध्ये प्रत्येक जण आपापल्या कामांमध्ये व्यस्त असतो. सूर्याची कोळी किरणे तर सोडाच इमारतींच्या जंगलांमुळे सूर्य कुठून उगवतो आणि कुठे मावळतो हे सुद्धा समजत नाही. शहरामध्ये क्वचितच कुठेतरी तुम्हाला भक्ती गीतांचे संगीत ऐकू येईल. याचबरोबर उदारतेची आणि माणुसकीची भावना फार कमी लोकांमध्ये पाहायला मिळेल.


मित्रांनो मराठी निबंध आवडला असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व इतर कुठल्या विषयावरती मराठी निबंध हवा असल्यास कमेंट मध्ये निबंधाचा विषय नक्की लिहा. आम्ही त्यावर निबंध लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर चला मग भेटूया पुढच्या मराठी निबंधामध्ये.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या