माझा आवडता खेळ मराठी निबंध | Maza Avadta Khel Marathi Nibandh
माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध | maza avadta khel cricket marathi essay
मित्रांनो आज आपण माझा आवडता खेळ ( maza avadta khel ) या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत. आजचा निबंध माझा आवडता खेळ क्रिकेट या विषयावरती असणार आहे. तर चला मग निबंध लिहायला सुरुवात करूया.
माझा आवडता खेळ मराठी निबंध |
मी अनेक खेळ खेळतो त्यामध्ये खूप खूप लंगडी, कबड्डी आणि क्रिकेट पण क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे.
आजच्या या आधुनिक युगामध्ये माणूस इतका गुंतला आहे की त्याला खेळाचे महत्व राहिलेले नाही प्रत्येक जण मोबाईल वरती गेम खेळण्यात व्यस्त आहे. आजची तरुण पिढी तर या मोबाईल्स गेमच्या मोहातच पडलेली आहे. आपली शरीर निरोगी आणि स्वस्थ राहण्यासाठी व्यायाम योगासने आणि खेल हे फार आवश्यक आहे. आजची भारतातील तरुण पिढी ही मोबाईल गेमच्या मोहात अडकली असली तरी क्रिकेट अत्यंत लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे साहजिकच आहे. की क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या फार कमी आहे आणि क्रिकेट पाहणारे व ऐकणारे यांची संख्या खूप जास्त आहे. मी त्यापैकीच एक. मी सुद्धा क्रिकेट खेळतो मोबाईल वरती नाही तर मैदानात जाऊन. क्रिकेट संबंधी माहिती पुस्तके वाचायला मला फार आवडते. मी क्रिकेटचा खूप मोठा फॅन आहे. प्रत्येक रविवारी आमचा ठरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. सर्व मित्रमंडळी संध्याकाळी जमतात आणि आम्ही माळावरती जाऊन क्रिकेट खेळतो. मित्रांनो जी मजा शेतमाळ्यांमध्ये क्रिकेट खेळण्यांमध्ये आहे ती मजा मोठमोठ्या ग्राउंड मध्ये सुद्धा नाही. क्रिकेट हे मला मैदानावरती जाऊन आणि तसेच दूरचित्रवाणीवर पाहायला सुद्धा आवडते. माझ्या मते भारतातील अनेक मुलांचा क्रिकेट हाच खेळ आवडत असेल.
मी लहान असताना आमच्याकडे फलंदाजीसाठी बॅट नसायची. त्यामुळे आम्ही एक फळी घेऊन तिला बॅटीचा आकार द्यायचो किंवा नारळीच्या चावलाची जी फांदी असते ती आम्ही बॅट म्हणून फलंदाजीसाठी वापरायचं. त्यानंतर येतात ते म्हणजे स्टम्प साठीसुद्धा तीन लाकडाच्या किंवा बांबूचा काठ्या मिळतील ते आम्ही वापरायचो. खूप मजा यायची राव. सकाळ दुपार संध्याकाळ किंवा रात्री आपण कधीही क्रिकेट खेळू शकतो. क्रिकेट खेळताना आमचे चेंडू सुद्धा अनेक उदाहरणे आहेत. आणि ते चेंडू शोधताना जी कसरत करावी लागते ती फक्त खेड्यातील क्रिकेट प्रेमींना समजू शकते त्यात सुद्धा एक मजा असते. मुख्य गोष्ट म्हणजे ज्याने चेंडू जोरात मारलाय आणि ज्याच्यामुळे चेंडू हरवलाय त्या फलंदाजाला टोमणे मारून मारून जोपर्यंत चेंडू मिळत नाही तोपर्यंत सतवल जात. आणि वेळ जर संध्याकाळची असेल तर मग विषयच वेगळा. मी मोबाईल वरती सुद्धा गेम खेळतो परंतु त्याचबरोबर मैदानी खेळ सुद्धा खेळणं मला फार आवडते.
Maza Avadta Khel Marathi Nibandh |
क्रिकेट या खेळामध्ये शरीराच्या खूप हवे अवयवांचा व्यायाम होतो. फलंदाजी करताना हातांचा व्यायाम होतो त्याचबरोबर आपल्या डोळ्यांचाही व्यायाम होतो कारण आपल्याला नजर ही चेंडूवर ठेवावी लागते, आणि जसाच बॉलर चेंडू आपल्याकडे टाकतो तो कोणत्या पद्धतीने मारायचा याचा सुद्धा आपल्याला अंदाज मांडावा लागतो. खरं म्हणजे मैदानी खेळ हे खेळलेच पाहिजेत याचे महत्त्व अपरंपार आहे. क्रिकेट खेळण्यासाठी 11 खेळाडूंची गरज असते तसे दहा खेळाडू चालतात परंतु आमच्याकडे फक्त मोजून पाच ते सहा खेळाडू असतात म्हणजेच आमचे मित्र मंडळी त्यामध्ये दोन टिप्स म्हणजे एका टीम्स मध्ये दोन किंवा तीन खेळाडू येतात आणि जर एक खेळाडू उरत असेल तर त्याला आम्ही दोन्ही टीम मध्ये घेतो आणि पार्टी विकेट कीपरिंग साठी ठेवतो म्हणजे तो खेळाडू दोन्ही टीमचे खेळाडू बाद झाल्यानंतर फलंदाजी करू शकतो परंतु गोलंदाजी करू शकत नाही. आणि याचीच फार मजा असते.
अनेकांना क्रिकेटमध्ये फक्त फलंदाजी करायला आवडते पण मला फलंदाजी सोबतच गोलंदाजी त्याचबरोबर बिल्डिंग सुद्धा करायला फार आवडते. गोलंदाजी मध्ये चेंडू फिरवण्याची अनेक प्रकार आहेत पण मला त्यातलं काहीही जमत नाही हातात आलेला चेंडू फलंदाजाकडे टाकायचा आहे आणि त्याची विकेट घ्यायचे एवढेच काय ते ध्येय. प्रत्येक टीम मध्ये असा एक खेळाडू असतोच ज्याला बाद करणे खूप गरजेचं असतं तो म्हणजे त्या टीम मधला प्रोखेळाडू आणि हा खेळाडू सहजासहजी बाद होत नाही. या खेळाडूने आपल्या ओव्हरला जर षटकार किंवा चौकार मारला की आपल्या टीम मधल्या इतरांच्या भावना तुमच्यावर व्यक्त होऊ लागतात की चेंडू असा टाक तसा टाक खूप प्रेशर असतो यावेळी माझ्या मते असं प्रत्येकाबरोबर होत असेल. आम्ही लहान मुले क्रिकेट खेळत असतानाच मध्येच मोठी माणसं म्हणजे काका किंवा दादा यायचे त्यांना काही फरक पडत नसायचा की बॅटिंग कोणती आहे आणि फिल्डिंग कोणती आहे ते. आल्या आल्या त्यांना फलंदाजी द्यावीच लागायचे आणि यावेळी ची टीम बॅटिंग करत असायचे ती सुद्धा फिल्डिंग करायला यायची कारण यांनी मारलेला चेंडू हा जर अडवला नाही किंवा तू कुठे जातोय तो पाहिला नाही तर तो हरवला समजायचा. अशाप्रकारे गावामध्ये क्रिकेटचा आनंद लहानापासून मोठ्यापर्यंत घेतला जातो.
गाव खेड्यांमध्ये अनेक क्रिकेटचे सामने होतात राज्यस्तरावर तालुकास्तरावर आणि ते पाहायला मी जातो. आणि अनेक क्रिकेट प्रेमी के सामने पाहायला आलेले असतात. यामध्ये लहान मोठे वृत्त सगळ्यांचा समावेश असतो. काही लोक तर आपले काम धंदा सोडून आलेले असतात. या सामन्यांमध्ये जर आपल्या तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे किंवा आपल्या गावाची टीम असेल तर मग मजाच वेगळी असते. गाव खेड्यांमध्ये जे सामने असतात त्यामुळे जास्त मोठी पारितोषिके नसतात. परंतु खूप दूरवरून क्रिकेट प्रेमी खेळ खेळण्यासाठी व पाहण्यासाठी आलेले असतात.
Marathi Essay |
आजच्या या बदलत्या आणि वेगवान युवकांमध्ये क्रिकेटचे स्वरूप सुद्धा बदलत जात आहे. आज क्रिकेटचा कसोटी सामन्यांबरोबरच एकच दिवसाची वन-डे क्रिकेट सुद्धा लोकप्रिय होत आहे. कारण या एकदिवसीय क्रिकेटमध्ये निकाल झटपट लागतो. आपल्या देशामध्ये अनेक महान क्रिकेटपटू होऊन गेले आहेत आणि त्यांनी संपूर्ण जगात आपल्या भारताचे नाव रोशन केले आहे. त्यामध्ये क्रिकेटचा बादशहा म्हणजेच सचिन तेंडुलकर हा माझा आणि सर्वांचा आवडता खेळाडू आहे.
फुटबॉल जरी जगातील सर्वात लोकप्रिय खेळ असला तरी भारतातील लोकप्रिय खेळ हा क्रिकेटच राहणार यात काही शंका नाही.
मित्रांनो मराठी निबंध आवडला असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व इतर कुठल्या विषयावरती मराठी निबंध हवा असल्यास कमेंट मध्ये निबंधाचा विषय नक्की लिहा. आम्ही त्यावर निबंध लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर चला मग भेटूया पुढच्या मराठी निबंधामध्ये.
इतर काही मराठी निबंध :-
1. छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध | Chhatrapati Shivaji Maharaj Marathi Nibandh Essay
0 टिप्पण्या