माझी शाळा मराठी निबंध | Majhi Shala Marathi Nibandh | My School Marathi Essay
मित्रांनो आज आपण माझी शाळा या विषयावरती एक सुंदर मराठी निबंध घेऊन आलेलो आहोत. या निबंधामध्ये शाळेतील अनेक आठवणी याविषयी आपण बोललो आहोत तर चला मित्रांनो माझी शाळा या निबंधाला सुरुवात करूया.
![]() |
माझी शाळा मराठी निबंध |
शाळा ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील कणा असतो.
एक यशस्वी आणि आदर्श व्यक्ती होण्यासाठी आवश्यक असणारे सर्व संस्कार आपल्याला शाळेतूनच मिळतात. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असे आहे. माझी शाळा ही तालुक्यातील एक आदर्श शाळा आहे. मी साधारण पाच वर्षाचा असताना शाळेत जायला लागलो तेव्हापासूनच मला शाळेत चाललेला लागला आहे.
तेव्हापासून आतापर्यंत अनेक अविस्मरणीय क्षण मी या शाळेत अनुभवले आहे. याच शाळेत मला माझे आदर्श शिक्षक भेटले ज्यांनी मला ज्ञानरूपी वारसा दिला. माझ्या शाळेची इमारत दोन मजली असून साधारण 20 खोल्या असलेली ही इमारत मला फार आवडते. इमारत ही खूपच प्रशस्त व सुंदर अशी आहे.
शाळेसमोर प्रशस्त मैदान आहे ज्यावर आम्ही मधल्या सुट्टीमध्ये आणि पीटीच्या तासाला सुद्धा खूप खेळतो. माझ्या शाळेत एक संगणक कक्ष आणि एक विज्ञान प्रयोगशाळा देखील आहे. इथे आम्ही वेगवेगळे प्रयोग शिकतो आहोत प्रात्यक्षिक केली आहेत. आणि यात आम्हाला खूप काही गोष्टी विषयी माहिती मिळायला खूप मदत झाली आहे. प्रयोगशाळेत वेगवेगळे प्रयोग व वेगवेगळ्या गोष्टी पाहण्यात खूप मज्जा येते. मी शाळेतील सर्व उपक्रमांमध्ये भाग घेतो.
माझी शाळा मला खूप आवडते. माझी शाळा माझ्यासाठी मंदिरात आहे खरोखर माझ्या शाळेत खूप छान असे मैदान आहे आम्ही तिथे खेळ खेळतो माझ्या शाळेतील शिक्षक खूप चांगले शिकवतात व ते मायाळू, प्रेमळ पण आहेत. माझ्या शाळेत प्रत्येक सण साजरा आणि उत्सवाने चांगला केला जातो. जसं की महात्मा गांधी जयंती, स्वतंत्र दिवस, भीम जयंती इत्यादी. माझ्या शाळेत खूप छान असे हिरवी वाली मोठे झाडे आहेत.जी जी आमच्या शाळेची सुंदरता खूप जास्त पटीने वाढवतात.
माझ्या शाळेत माझ्या खूप सार्या मैत्रिणी व मित्र आहेत. त्यांच्यासोबत खेळायला अभ्यास करायला खूप छान वाटते. जेवणाच्या सुट्टीत एकत्र बसून मिळून मिसळून हसत गप्पा गोष्टी करत डब्बा खायला खूप आवडते. हा अनुभव फक्त मला शाळेतच घेता येतो शाळेत जीवन खूप आनंदी आहे. माझ्या शाळेत वाचनालय देखील आहे त्याच बरोबर प्रत्येक प्रत्येक मुलाला चांगले घडविण्यात आई बाबांचा जीवडा वाटा असतो, तितकाच वाटा शाळेचाही असतो. माझी शाळा पहिली ते दहावी पर्यंत आहे. माझ्या शाळेचा परिसर नेहमीच सुंदर आणि स्वच्छ असतो. मला माझ्या शाळेचा खूप खूप अभिमान वाटतो. माझ्यासाठी शाळा माझे दुसरे घरच आहे असे वाटते.
माझी शाळा मराठी निबंध 10 ओळींमध्ये
माझी शाळा समाजातील सर्वात लोकप्रिय आणि उच्च दर्जाची शाळा आहे.
माझ्या शाळेची इमारत अतिशय सुंदर हिरवी आणि प्रशस्त आहे.
माझ्या शाळेत प्रचंड मोठे क्रीडांगण आहे. मी त्या मैदानावर अनेक मैदानी खेळ खेळतो.
मी माझ्या मित्रांसोबत शाळेत खेळतो. आम्ही एकत्र अभ्यासही करतो.
माझ्याकडे वर्गशिक्षक आणि अनेक विषय शिक्षक आहेत. ते मला नेहमी नवीन गोष्टी शिकण्यास मदत करतात.
माझ्या शाळेत अनेक कार्यक्रमाने सण साजरे होतात.
मी माझ्या शाळेच्या ग्रंथालयात पुस्तके ही वाचतो. शाळेचे ग्रंथालय खूप मोठे आहे.
माझ्या शाळेत प्रयोगशाळा देखील आहे. सर्व विज्ञान आणि सामाजिक विज्ञान प्रयोगशाळा सुसज्ज आहेत.
मला रोज सकाळी माझ्या शाळेत जायला आवडते कारण मी माझ्या शाळेत नवनवीन गोष्टी शिकतो.
माझी शाळा आदर्श शाळा आहे.
मित्रांनो मराठी निबंध आवडला असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व इतर कुठल्या विषयावरती मराठी निबंध हवा असल्यास कमेंट मध्ये निबंधाचा विषय नक्की लिहा. आम्ही त्यावर निबंध लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर चला मग भेटूया पुढच्या मराठी निबंधामध्ये.
इतर काही मराठी निबंध :-
1. छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध
0 टिप्पण्या